भुसावळ येथील इफ्तार पार्टीत पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची विशेष उपस्थिती

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ जंक्शन शहर हे खऱ्या अर्थाने ‘मिनी हिंदुस्तान’ आहे याचे एक नाही अनेक उदाहरणे आहेत. सर्व जातीचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही जातीय तेढ निर्माण झाले, अशी घटना शहरात झाली नाही ही अभिमानाची बाब आहे. नेहमीच भुसावळकरांचे पोलीस प्रशासनाला सहकार्यास असते असे प्रतिपादन रिंग रोड येथील शिखर इन्स्टिट्यूट येथे जळगाव जिल्हा पोलीस, भुसावळ उपविभाग व शिखर ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने आयोजित इफ्तार पार्टीत प्रथमच भुसावळला एका कार्यक्रमात हजेरी लावत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले. या प्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार नीता लबडे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संदीप पानझाडेसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

शहरामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा रहावा शांतता नांदावी पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे तसेच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही याचे दक्षता घेत सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही यावेळेस पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी यांनी केले. ईद हा गुण्यागोविंदाने आनंदाने साजरी करा येत्या आठ दिवसांमध्ये रमजान ईद साजरी होणार आहे यातही समाज ईदही मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करा असावा असेही त्यांनी शेवटी सांगितली. रोजा इफ्तार पार्टीमध्ये उपस्थित शेकडो रोजदारांसाठी फळ, अल्पोहार, सरबत, शितपेय आदींची व्यवस्था करण्यात आली होती. शिखर एनजीओचे अध्यक्ष रफिक शेख व उपाध्यक्ष वासेफ पटेल, जिल्हाध्यक्ष जाकिर शेख, खलील मन्यार, संजय पाटील, सय्यद मोहम्मद, शकील अली, फहीम शेख, जुनेद खान, शबिर अहमद, मुजाहिद तडवी, साजिद कुरेशी आदींनी परिश्रम घेतले.

सामाजिक कार्यकर्ते मुकेश गुंजाळ हे दरवर्षी शिवजयंतीची मिरवणूक खडका रोड, जाम मोहल्ला भागातून काढतात. मात्र यंदा आचारसंहिता, मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते ही बाब पोलीस प्रशासनाने गुंजाळ यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच पोलीस प्रशासनास सहकार्य करत शिवजयंतीची मिरवणूक रद्द केली. गुंजाळ यांचा पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Protected Content