अमळनेरात स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती व मॅरेथॉन स्पर्धा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदार संघाच्या अमळनेर मतदार संघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी अमळनेर तालुक्यात मॅरेथान स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली होती.

मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक रामदास वडर, व्द‍ितीय क्रमांक कृष्णा गायकवाड, तृतीय क्रमांक राहुल पावरा व महिला गटात प्रथम क्रमांक मनिषा गावीत, व्द‍ितीय क्रमांक शिल्पा हयाळीज, तृतीय क्रमांक राजश्री देशमुख यांनी पटकवाला.सदर बैठकीत विजेता झालेल्या सर्व स्पर्धक यांना प्रमुख अतिथी लकडाबाई रामचंद्र अहिरे ,101 वर्ष वय असलेल्या मतदार यांच्या हस्ते बक्षीत वितरण करण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धक यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आला. तसेच मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. सदर स्पर्धेच्या वेळी रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर, तुषार नेरकर मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर, प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content