जळगाव जिल्ह्यात आज ९६१ रूग्ण कोरोनामुक्त; तर ८३५ रूग्ण कोरोना बाधित

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात जिल्ह्यात ८३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरात १९९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत. तर अमळनेर, पारोळा आणि एरंडोल तालुक्यातही रूग्ण वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पहिल्यांदा आज ९६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ८३५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १९९ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१९९; जळगाव ग्रामीण-३५; भुसावळ-३४; अमळनेर-१०५; चोपडा-५१; पाचोरा-५; भडगाव-११; धरणगाव-८; यावल-३९; एरंडोल-७५, जामनेर-६२; रावेर-८; पारोळा-९५; चाळीसगाव-८०; मुक्ताईनगर-२०, बोदवड-७ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असे एकुण ८३५ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ३४ हजार ४५३ इतकी झालेली आहे. यातील २४ हजार ३०४ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ९६१ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १७ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ८९४ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार २५५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content