जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार येथील पीपल बँकेकडे जात असलेल्या रोडवर वृध्दाच्या खिशातून ५० हजार रूपयांची रोकड लांबविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सेवाराम टेकचंद सिंधी (वय-६७, रा. विद्यानगर, फैजपूर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील दाणाबाजार येथील पीपल बँकेच्या परिसरात १ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता आले होते. त्यावेळी ते पायी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ५० हजार रूपयांची रोकड लांबवली. ही घटना त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु पैशांसंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी मंगळवार २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साळवे हे करीत आहे आलेले होते.