भाजप प्रवक्त्याला मारहाण; राष्ट्रवादीच्या चौघांविरूद्ध गुन्हा    

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवर शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शनिवारी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केतकी चितळे प्रकरणातच हे प्रकरण घडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेचा निषेध करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चौघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ५०४, ३२३ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!