मंगरूळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली धूम्रपान विरोधी शपथ

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील मंगरूळ येथील आबासो अनिल अंबर पाटील हायस्कूलमध्ये ‘धूम्रपान विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी धूम्रपान विरोधी शपथ घेतली

तालुक्यातील मंगरूळ येथील आबासो अनिल अंबर पाटील हायस्कूलमध्ये ‘धूम्रपान विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी धूम्रपान विरोधी शपथ घेतली. प्रसंगी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी तंबाखू, धूम्रपान याचे तोटे, शरीर, कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगण्यात आली. विद्यार्थ्यांची धूम्रपान विरोध चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेच्या आधारे चित्र रेखाटले. त्यात मुलींमध्ये साक्षी प्रवीण पाटील प्रथम तर प्रतीक्षा अनिल पाटील द्वितीय आणि मुलांमध्ये यश देविदास पाटील प्रथम तर मयूर किशोर पाटील यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मंगरूळमार्फत बक्षीस देण्यात आले.

या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ हेमंत कदम, हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, संजय पाटील, प्रभूदास पाटील, अशोक सुर्यवशी, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, आरोग्य सेवक सी एम पाटील उपस्थित होते.

Protected Content