महिमा आणि मानसी तेलीचे बीएएमएस परिक्षेत सुयश

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील महिमा तेली आणि मानसी तेली यांनी वैद्यकिय क्षेत्रातील बीएएमएसच्या अंतिम परिक्षेत  घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे ह्या दोघांचे सर्वत्र कौतूक व अभिनंदन होत आहे.

तालुक्यातील खडकदेवळा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस पाटील तुकाराम धोंडू तेली यांच्या स्नुषा व वाकी (जामनेर) येथील रहिवाशी रहिवाशी आप्पा सरताळे यांत्या सुकन्या महिमा या वैद्यकिय क्षेत्रातील बीएएमएस (आयुर्वेद) ही अंतिम परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या असून त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. एमईएस आयुर्वेद कॉलेज रत्नागिरी (कोकण) येथे त्यांनी हा कोर्स पुर्ण केला. सासर आणि माहेरकडील परिवार शेतकरी असून त्यांनी मुलीला डॉक्टर बनवल्यामुळे व  तिच्या यशामुळे सर्वत्र त्या परिवाराचे अभिनंदन होत आहे. याचबरोबर कुऱ्‍हाड ता. पाचोरा येथील दिलीप तेली यांची सुकन्या मानसी तेली हिने देखील बीएएमएस अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून मानसी तेली ह्या पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते हरीलाल पंचोले यांच्या स्नुषा आहेत. तेली परिवारातील या दोघींनी वैद्यकिय क्षेत्रात मिळविलेल्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!