महाराष्ट्रात अटीतटीची रंगत : सात उमेदवारांमध्ये लढत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या ६ जागांसाठी भाजपच्या तीन, शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी एक असे सात उमेदवारांमध्ये लढत आहे. भाजपने तिसरा तर शिवसेनेने दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे. त्यात एक प्रकारे भाजपाने तिसरा उमेदवार दिल्याने शिवसेनेची कोंडी झाली असल्याचे चित्र आहे.

देशातील १५ राज्यातून राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात राजस्थान महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकपैकी महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपाचे ३, शिवसेनेचे २, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक असे सात उमेदवार असून भाजपने तिसरा उमेदवार उभा केल्याने सारे संदर्भच बदलले. भाजपाच्या अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. या चारही राज्यात भाजपाने त्यांची ताकद पूर्ण पणाला लावली असून महाराष्ट्रात निवडणूक प्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांनी नियुक्ती केली आहे.

भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी आ. अनिल बोंडे, आणि धनंजय महाडिक यांना तर राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेसने इम्रान प्रतापगढी तर शिवसेनेने खा. संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने तिसरा उमेदवार देत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपच्या या आक्रमक खेळीने शिवसेनेचा दुसरा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे.

भाजपकडे २२ अतिरिक्त मते आहेत. शिवाय याशिवाय सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांचे सदस्य बरोबर असल्याने भाजपला तिसऱ्या उमेदवारासाठी १३ मतांची आवश्यकता आहे. तर राष्ट्रवादी शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्याकडे प्रत्येकी १२,१३ आणि ३ असे अतिरिक्त मते असून त्यांना ११ मताची आवश्यकता आहे.

अपक्षांसह अन्य लहान पक्षातील आमदारांचा ‘भाव’ वधारला
एकीकडे राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपने सारी ताकद पणाला लावल्याने घोडेबाजार होणार हे स्पष्ट असून १३ अपक्ष तर १६ छोटय़ा पक्षांचे सदस्य अशा ९ आमदारांचा ‘भाव’ वधारला आहे. आणि या अपक्षांसह अन्य व छोटय़ा पक्षांच्या २९ आमदारांवर महाविकास आघाडी तसेच भाजप दोघांची मदार असल्यामुळे या आमदारांना सांभाळण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांपुढे आहे.

Protected Content