Home आरोग्य …. आणि एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना सोडावं लागलं आझाद मैदान

…. आणि एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना सोडावं लागलं आझाद मैदान

0
34

मुंबई वृत्तसंस्था | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करता येणार आहे. मात्र ५ वाजेनंतर त्यांना आझाद मैदान सोडावं लागणार आहे.

राज्यात काल 8 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले असून सर्वानी आरोग्याविषयी सावधानता बाळगत कोविड १९ च्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन ठराविक वेळेसाठी बंद करावं लागणार आहे.

राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार या कर्मचाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दाखवत ठराविक वेळेसाठी आझाद मैदान सोडणार आहेत मात्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं सांगितलं.

 


Protected Content

Play sound