१५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण नोंदणीस पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद

मुंबई वृत्तसंस्था | देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार असून आजपासून कोविन (CoWIN) अ‍ॅपवर त्याची सुरु नोंदणी झाली आहे. या नोंदणीला भरघोस प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी अडीच लाखांहून जास्त नोंदणी करण्यात आली आहे

सोमवार, दि. 3 जानेवारीपासून देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार असून आजपासून कोविन (CoWIN) अ‍ॅपवर त्याची सुरु नोंदणी झाली आहे. या नोंदणीला भरघोस प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी अडीच लाखांहून जास्त नोंदणी करण्यात आली आहे.

आधार कार्ड नसल्यास आयकार्डने करता येणार लसीकरण

CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी मुलांना अडथळा येऊ नये म्हणून आधार कार्ड नसेल तर आयकार्डने नोंदणी करत लसीकरण करता येणार आहे. लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. कोवॅक्सिन आणि Zydus Cadila’s ZyCoV-D या दोन लसीपैकी एक पर्याय निवडता येणार आहे.

Protected Content