Home Cities जळगाव रोटरी पब्लिक टॉयलेट” उपक्रमाचे भूमिपूजन उत्साहात

रोटरी पब्लिक टॉयलेट” उपक्रमाचे भूमिपूजन उत्साहात

0
119

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे पद्मालय विश्रामगृहजवळ नागरिकांसाठी शौचालय उभारणीच्या उपक्रमाचे भूमिपूजन शनिवारी २५ रोजी संध्याकाळी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

 

प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, सह प्रांतपाल अरुण नंदर्षी, मोनिका झुनझुनवाला, रोटरी क्लबचे ऑफ ईस्टचे अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, सचिव अमरनाथ चौधरी उपस्थित होते. “रोटरी पब्लिक टॉयलेट” उपक्रमाविषयी अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी माहिती सांगितली. सर्वसामान्यांना शहरात वर्दळीच्या ठिकाणी प्रसाधनगृह उपलब्ध होणार असल्यामुळे गैरसोय दूर होणार असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

 

प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रोटरी क्लबचे उपक्रम महत्वाचे ठरतात, असे सांगितले. प्रकल्पासाठी सूत्रसंचालन संजय गांधी यांनी तर आभार प्रकल्प चेअरमन राहुल भन्साळी यांनी मानले. नितेश जैन, विनोद भोईटे, पूर्वेस शहा, डॉ. जगमोहन छाबरा, पियुष संघवी, सुनील शहा, अमित शर्मा, मितेश शहा, प्रणव मेहता, संजय शहा आदींनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound