भडगाव येथे रंगला आजी माजी क्रिकेटर सदस्यांचा मेळावा

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरात पाचोरा रोड माऊली लॉन्स येथे आजी माजी क्रिकेटर यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ‘ओन्ली फ्रेंड सर्कल’ कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्राध्यापक तांदळे हे उपस्थित होते.

 

भडगाव शहरात एक अनोखी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पाडले. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाला अनोखी म्हटले म्हणजे सन 2009 ते 2023 वर्षातील ओन्ली फ्रेंड सर्कल या क्रिकेट मध्ये खेळणाऱ्या किंवा खेळून चुकणाऱ्या आजी-माजी क्रिकेटर १७० सभासद खेळाडू उपस्थित होते.  वयाचे १६ वर्षापासून ५० वर्षापर्यंतचे सभासद खेळाडू होते. यात वशिष्ठ म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर, मेडिकल व्यवसाय, नगरसेवक, व्यापारी, पोलीस खात्यातील, राजकारणी आणि विद्यार्थी असा ग्रुप भडगाव तालुक्यात सर्वात मोठा ओन्ली क्रिकेट ग्रुप मानला जातो.

 

या कार्यक्रमात जुने खेळाडू आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.निलेश पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, स्व. बापूजी फाउंडेशनचे संस्थापक लकीचंद पाटील, सतीश पाटील, संदीप पाटील, शरद हिरे, डॉ. दिलीप पाटील, आजी-माजी सभासदांनी आपापल्या लहानपणाचे जुने किस्से व शाळेतील गमती जमती विनोदी ऐकून संपूर्ण या कार्यक्रमात उत्साहात शोभा वाढली.

 

या कार्यक्रमात अध्यक्षस्थान प्रा.डॉ. दिनेश तांदळे यांना देण्यात आले आणि सर्व लहान मोठे खेळाडू मान्यवर एकाच ठिकाणी बसवण्यात आले. फक्त खेळाडू म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सुनील देशमुख, पाचोरा रोड येथील माऊली लॉन्स व मंडप इलेक्ट्रिक स्पीकर उपलब्ध करून दिले तसेच ओन्ली फ्रेंड सर्कल सभासद खेळाडूंनी आपापल्या परीने सहकार्य केले. कार्यक्रमांतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. आठवणीसाठी ग्रुप फोटो घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर पाटील, विनोद महाजन, सुरेश मांडोळे व सर्व ओन्ली क्रिकेट फ्रेंड्स सर्कल परिश्रम घेतले जगदीश सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले तालुक्यातील सर्वात मोठे स्नेहसंमेलन ठरले.

Protected Content