वयात फेरफार करून खेळणाऱ्या मनजोत कालरावर एका वर्षाची बंदी

मुंबई : वृत्तसंस्था । वयात फेरफार केल्याने वय १९ वर्षाखालील असल्याचं मनजोत कलाराने भासवलं. यामुळे त्याला अंडर १९ विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांनी मनजोतच्या आई वडिलांवर मनोजच्या वयात फेरफार केल्याचा आरोप ठेवला. यामुळे मनजोतला एका वर्षासाठी रणजी ट्रॉफी खेळता आली नाही.

३ वर्षांपूर्वी भारताने चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला होता. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला आठ गड्यांनी पराभूत केले. ही मॅच ३ फेब्रुवारी २०१८ रोजी माउंट मौनगुनी येथे झाली होती. दणदणीत शतक ठोकून मनजोत कालरा हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. परंतु मॅच संपल्यानंतर काही दिवसांनंतर मनोज कालराने त्याच्या वयात फेरफार केल्याचं समोर आलं होतं.

अंडर १९ चा अंतिम सामना झाल्याच्या एका वर्षाने मनजोतने विश्वचषक खेळण्यासाठी त्याच्या वयात फेरबदल करुन घेतल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. चौफेर आरोपानंतर बीसीसीआयने त्याची चौकशी केली. बीसीसीआयच्या चौकशीत तो निर्दोष सुटला परंतु दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात तो अडकला. मनजोतच्या आई वडिलांनी त्याचं वय कागदोपत्री एक वर्ष कमी दाखवलं होतं.

या झालेल्या प्रकारानंतर बीसीसीआयने त्याच्यावर एक वर्ष रणजी खेळण्याची बंदी आणली होती. अंडर १९ चा कोच राहुल द्रविडने या पार्श्वभूमीवर तडक भूमिका घेत हा गंभीर गुन्हा असल्याचं म्हटलं होतं.

Protected Content