मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Railway

 

मुंबई प्रतिनिधी । मुलुंड ते माटुंगा आणि कुर्ला-वाशी हार्बर दरम्यान जलद मार्गावर आज मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केले आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर आणि कुर्ला-वाशी हार्बर मार्गावर आज मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला असून पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे आज तिन्ही मार्गावरील लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावतील. सुट्टीचे वेळापत्रक आणि लोकल विलंब यामुळे रेल्वे प्रवाशांना पुन्हा एकदा विलंब यातना सहन कराव्या लागणार आहेत.

Protected Content