अखेर फेसबुकने भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट हटवल्या !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाचे नेते टी. राजा सिंह आणि आनंद हेगडे यांच्या वादग्रस्त पोस्ट फेसबुकने अखेर हटवल्या आहेत.

 

फेसबुकच्या निष्पक्षतेवर ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कंपनीने भाजप टी. राजा सिंह आणि आनंद हेगडे यांच्या वादग्रस्त पोस्ट हटविल्या आहेत. फेसबुकने भाजप नेत्यांच्या ‘हेट स्पीच’ असलेल्या पोस्टविरोधात कारवाई करण्यास फेसबुक जाणून बुजून कुचराई करत आहे असे जर्नलने म्हटले होते. एका मोठ्या योजनेच्या आड फेसबुक हा भाजप आणि कट्टरतावाद्यांबाबत पक्षपातीपणा करत आहे, असेही जर्नलने म्हटले होते. या रिपोर्टनुसार भाजपाच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांच्या एका पोस्टमध्ये राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भारतातील सत्ताधारी पक्ष अर्थात भाजपाचे नेते आणि संबंधित काही ग्रुपवर कारवाई करण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने केला आपल्या रिपोर्टमधून केला होता.

Protected Content