न्हावी येथे सद्गुरू स्मृति महोत्सव ; आरोग्य शिबीर

nhavi

 

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथे सद्गुरु नीळकंठदासजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त भव्य ‘सद्गुरु स्मृती’ महोत्सवाची सुरुवात (दि.२४) पासून झाली आहे. या महोत्सव अंतर्गत आज मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण इत्यादी कार्यक्रम प्रथम सत्रात राबविण्यात येत असून या आरोग्य शिबीरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

आज महोत्सवाचा दुसरा दिवस असून प्रथम सत्रामध्ये श्रीमद् भागवत कथेचे वक्ते सद्गुरू शा. भक्तिप्रकाशदासजींनी सुंदर कथेचे विवेचन केले. केवळ आध्यात्मिक परंतू सामाजिक अनेक उपक्रम या महोत्सवात दिन प्रतिदिन होणार आहेत.
या महोत्सव अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधी वितरण, मोफत रक्त, लघवी तपासणी करण्यात आले. दुपार 1 वाजेपर्यंत जवळपास 5 हजार रुग्णांची तपासणी केली आहे.

या डॉक्टरांनी केले सहकार्य
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुज्य देव स्वामी (चेअरमन, वडताल), वक्ताश्री भक्तिप्रकाश शास्त्री, महोत्सवाचे अध्यक्ष शास्त्री धर्मप्रसादादसी, धर्मस्वरूप शास्त्री (भुसावल), डॉ. कुंदन फेगडे उपस्थित सर्व संत व डॉक्टर यांच्याहस्ते करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात डॉ. कुंदन फेगडे (स्त्रीरोग तज्ञ, यावल), डॉ. सचिन राणे (नाक,कान,घसा तज्ञ, भुसावळ), डॉ. महेन्द्र चौधरी (नेत्ररोग तज्ञ, भुसावळ), डॉ. दिलीप भरकर (जनरल फिजीशियन, फैजपुर), डॉ. भरत महाजन (जनरल फिजिशियन, फैजपुर), डॉ. पंकज नेहेते (त्वचा रोग तज्ञ, सावदा), डॉ. अभिजीत सरोदे (स्त्री रोग तज्ञ, फैजपुर), डॉ. प्रशांत जावळे (बाळरोग तज्ञ, यावल), डॉ. गौरव धांडे (अस्थिरोग तज्ञ,यावल), डॉ. पराग पाटील (दंत रोग तज्ञ, यावल), यांचे सहकार्य लाभले.

औषध वितरण
नितीन महाजन (महाजन मेडिकल, यावल) यांच्याकडुन सर्व रुग्णांना मोफत औषध वितरण करण्यात आले आहे. तसेच अनिल लढे (लक्ष्मी मेडिकल, न्हावी) यावेळी स्वामिनारायण गुरुकुल प्राचार्य संजय वाघुळदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समस्त उपस्थित होते.

Protected Content