जिल्ह्यात पॅसेंजर सुरू करा, अन्यथा रेल रोको आंदोलन – दिलीप पाटील

पाचोरा, प्रतिनिधी । स्पेशल कोवीड ट्रेनच्या नावाखाली लोंढे आणण्यात येत आहे. सामान्य प्रवाश्यांना मूर्ख बनिवण्याचा कुटील डाव रेल्वे प्रशासन करीत आहे. सामन्य प्रवाश्यांना जिल्ह्यांतर्गत प्रवास करणारी शटल तत्काळ सुरू करावी अन्यथा रेले रोको करणे गरजेचे ठरणार असल्याची माहिती ट्रेन लाईव्ह संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांनी कळविले आहे.

रेल्वेच्या भोंगळ काराभाराबाबत शंका येऊ लागली आहे. लोंढे आणण्यासाठी बंद असलेल्या सर्वच रेल्वे कोविड – १९ स्पेशल नाव देऊन सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व सामान्य प्रवाशांना मूर्ख बनविण्याचा कुटील डाव आखण्यात आला. एकीकडे गरिबांसाठी कोरोनाचा डर तर दुसरीकडे श्रीमंतांना आरक्षित तिकीटांचा भडीमार करण्यात आला. एका खेड्यातून दुसऱ्या व जवळच्या तालुका शहरात, जिल्ह्यात जाण्यासाठीची ग्रामीण जनतेची शटल बंद करण्यात हुशारकी मिळविणाऱ्या रट्टेबाज, निद्रिस्त अधिकारी वर्गाला ही बाब लक्षात आणून देण्यासाठी आपआपल्या स्थरावर रेल्वे रोको करणे गरजेचेच झाल्याचे दिसत आहे. 

ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना ट्रेन सुरू होणे, सामान्य तिकीट मिळणे व वेळोवेळी मेमु तात्काळ धावणेसाठी प्रयत्न करीतच आहे. व नुकतेच चाळीसगांव तालुक्याचे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे आमदार यांनी रेल रोको बाबत ७ दिवसांच्या दिलेल्या अल्टीमेटलमला भुसावळ मंडळाने केराची टोपली दाखवत रेड सिग्नल दिलेला आहे. व या निवेदनाला कुठलीही हवा भुसावळ मंडळाने न दिल्याने आमदार साहेबांनीही यलो सिग्नल पकडत आपल्या म्हणण्याप्रमाणे ७ दिवस उलटले तरीही रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने काहीच घेतले नसल्याने येत्या २ ते ३ दिवसाच्या आत जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या शब्दाला टिकत ग्रीन सिग्नल देत रेल रोको करून या निद्रिस्त भुसावळ मंडळाला जाग आणणे गरजेचे झालेले आहे. 

या विषयासाठी ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना आपल्या सोबत राहीलच, तसेच इतर पण केंद्रात व राज्यात सत्तेची चाख चाखणारे इतकी गम्मत गरीब ग्रामीण जनतेची बघतील व एक शब्द ही काढणार नाहीत असे वाटत नव्हते. आणि जनतेला हे समजणार नाही इतकी मूर्ख जनता नाही. सर्वच प्रवाशी, चाकर मानी, सामान्य जनतेने, राजकीय नेते व पत्रकार बंधूनिही या विषयात लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. असे मत ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.

 

Protected Content