आकाश महालपूरे राष्ट्रीय समाज-गौरव पुरस्काराने सन्मानित

पाचोरा, प्रतिनिधी । लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या वतीने समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार सन -२०२१ गोंदेगाव येथील भूमिपुत्र आकाश दिपक महालपूरे यांना ३ फेब्रुवारी रोजी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. नम्रता आनंद पटणी (बिहार), अर्चना मेडेवार, ॲड. मंजूषा कटणी (मध्यप्रदेश), गजानन गंजेवार (पुणे), संजीव कुमार (समस्तीपूर) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. आकाश महालपूरे यांचे मराठी साहित्यातील कोरोनाकाळातील अनेक साहित्य वर्तमानपत्रामध्ये प्रकाशीत झालेले असून त्यांनी मराठी साहित्यातील जनजागृतीबाबत दिलेले योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आकाश महालपूरे यांचे या पुरस्काबद्दल सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

 

Protected Content