नगर परिषदेने दिली विविध कर भरण्याच्या मुदतीत वाढ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील करदात्यांना विविध कर भरण्यासाठी नगर परिषदेने मुदतवाढ दिली आहे.

नागरीक, व्यापारी करदाते यांना सन २०२१ – २०२२ या वित्तीय वर्षाची मालमत्ताकर / पाणीपट्टीकर / जागा भाडे / गाळाभाडे इ. करांचा भरणा करण्यासाठी शनिवार, दि. ३० एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून याची नागरीक / व्यापारी / व्यावसाईक यांनी नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन पाचोरा नगरपालिकेने केले आहे.

जे नागरीक थकबाकीदार असतील त्यांच्यावर जप्तीची व नळ संकूलन बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत ज्या नागरीकांनी आपल्या घराच्या छतावरील पाणी जमिनीती मुरविणे (रेन वॉटर हार्वेस्टींग), घराच्या आवारात ५ झाडे, सोलर सिस्टीमचा वापर (ग्रिन बिल्डींग) केले असेल त्यांना मालमत्ताकरात ६ टक्के सुट देण्यात येईल. सन – २०२१ / २०२२ चा मालमत्ताकर दि.३० एप्रिल २०२२ पर्यंत  जे नागरीक भरतील त्यांना मालमत्ताकरात व्याज व पेनल्टीत सुट देण्यात येईल. असे पाचोरा न.पा.च्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content