श्रमिक गोजमगुंडे यांना वसुंधरा रत्न पुरस्कार प्रदान

चाळीसगाव प्रतिनिधी । वसुंधरा फाउंडेशन चाळीसगावच्यावतीने सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांना वसुंधरा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने वसुंधरा फाऊंडेशतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात दुर्गसंवर्धन बाबत राबवित असलेल्या चळवळी साठी राज्य स्तरावरील वसुंधरा रत्न पुरस्कार सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांना प्रदान करण्यात आला. यानंतर श्रमिक गोजमगुंडे यांचे शिवकालीन किल्ल्यांचे महत्व या विषयावर अभ्यासपूर्ण ओजस्वी व्याख्यान झाले. श्री गोजमगुंडे यावेळी बोलताना म्हणाले की साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज आजही प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवीत असून त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांवर गेल्याने त्यागाची बलिदानाचे आणि देशासाठी राज्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते व चैतन्य निर्माण होते म्हणून गड-किल्ल्यांवर गेले पाहिजे व त्यांच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दुरावस्था का झाली याचे खरे कारण माहिती झाल्यास प्रत्येक माणूस प्रथम त्या गड किल्ल्यावर नतमस्तक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले वसुंधरा फाउंडेशन आयोजित केलेल्या कार्यक्रमात असलेल्या व्यासपीठावरील महिलांची संख्या पाहता ही महिलांची उपस्थिती इतिहास घडवणारी असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले वसुंधरा फाउंडेशनचे सचिन पवार अध्यक्ष धरती पवार व सदस्य यांच्या कार्याचा गौरव करीत वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी आणि माझे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे त्यांनी भावनिक उद्गार काढले व पुढे बोलताना त्यांनी आव्हान केले की फक्त जयंती पुरते छत्रपती शिवाजी महाराज न आठवता त्यांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून कायमस्वरूपी त्यांना अभिवादन केले पाहिजे तसेच मनोज पाटील यांनी काढलेला चित्रातून त्यांना अभिवादन केल्याचे सांगतांना प्रत्येकाने आपापल्या कलेतून शिवाजी महाराजांची प्रेरणा जोपासल्यास ती त्यांना अधिक चांगले आदरांजली ठरेल असेही ते या वेळी म्हणाले
तालुक्याचे आमदार उन्मेशदादा पाटील यांनी आपल्या मनोगतात वसुंधरा फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव करीत वसुंधरा रत्न पुरस्कार सह्याद्री प्रतिष्ठानच्या श्रमीक गोजमगुंडे यांना देऊन कोहिनूर हिरा निवडल्याचे सांगत चित्रकार मनोज पाटील यांच्या चित्रप्रदर्शनातून नवोदित कलाकारांना प्रेरणा देण्याचे काम वसुंधरा फाऊंडेशनच्या सदस्यांनी केल्याचे त्यांनी बोलून दाखविले

दरम्यान, चित्रकार मनोज पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जिवनावर आधारित एक दिवसीय चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील विविध प्रसंगांवर आधारित चित्रांनी महाराजांच्या विविध गुणांची ओळख करून दिली. सुराज्य निर्माण करण्यासाठी प्राण पणाला लावणार्‍या जिवाजी महाले, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशिद आदी विर मावळ्यांच्या चित्रांनी त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली.

या कार्यक्रमाला आमदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, उद्योजक मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प स सभापती स्मितल बोरसे, महिला आयोग सदस्य देवयानी ठाकरे, अंबाजी गृप चेअरमन चित्रसेन पाटील, सह्याद्री प्रतिष्ठान चे दिलीप घोरपडे, संभाजी सेना संस्थापक लक्ष्मण शिरसाठ, रयत सेना संस्थापक गणेश पवार, आई फाउंडेशन संस्थापक डॉ विनोद कोतकर, दुध फेडरेशन चे प्रमोद पाटील, रोटरी चे माजी उप प्रांतपाल डॉ सुनिल राजपुत, युगंधरा फाउंडेशन च्या स्मिता बच्छाव, जिजाऊ जयंती उत्सव समिती च्या सोनल साळुंखे, सिद्धी महिला मंडळ अध्यक्ष डॉ उज्वला देवरे, समाजसेवी मिनाक्षी निकम, उमंग सृष्टी परिवार संस्थापक संपदा पाटील, रंगगंध चे डॉ मुकुंद करंबेळकर, अंबाजी गृप चे निलेश निकम, चित्रकार धर्मराज खैरनार, जिजाऊ महिला मंडळ संस्थापक मनिषा पाटील, रांगोळीकार कावेरी पाटील, उद्योजक राज पुन्शी, जेसीआय अध्यक्ष हरेश जैन, पत्रकार आर डी चौधरी , शिव व्याख्याते पंकज रणदिवे, सह्याद्री प्रतिष्ठान चे प्रकाश नायर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अंबाजी गृप चेअरमन चित्रसेन पाटील, महिला आयोग सदस्य देवयानी ठाकरे, डॉ सौ.उज्ज्वला देवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुंधरा फाउंडेशन चे संस्थापक सचिन पवार यांनी तर सूत्रसंचालन गजानन मोरे व आभार प्रदर्शन संजय पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अध्यक्षा धरती पवार, सचिव सुनील भामरे, कोषाध्यक्ष देवेन पाटील, संचालक रविराज परदेशी, यांनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content