यावल ग्रामीण रूग्णालयात खासदार निधीतून आठ ऑक्सीजन यंत्रणेचे लोकार्पण

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सीजनची कमतरता पडू नये, यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या खासदारनिधीतून यावल ग्रामीण रूग्णालयासाठी आठ ऑक्सीजन यंत्रणेचे लोकार्पण सोहळा आज सकाळी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला.

भाजपातर्फे यावल ग्रामीण रूग्णालयात संपन्न झालेल्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रविंद्र पाटील, पंचायत समितीची सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव,  कोरपावली विकासोचे चेअरमन राकेश फेगडे, पंचायत समितीच्या सदस्या लक्ष्मी मोरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, नरेन्द्र नारखेडे, सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, महीला आघाडीच्या विद्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष डॉ. नरेन्द्र कोल्हे, भरत महाजन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी. बी. बारेला यांच्यासह आदी पदधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!