गुरूवर्य पाटील व झांबरे विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी)। ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ या भजनाने साऱ्या समाजाला आपल्या कीर्तनातून व कृतीतून समानतेची शिकवण देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून देणाऱ्या जगद्गुरू राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील व ए.टी. झांबरे  विद्यालयात करण्यात आले.

मान्यवरांच्याहस्ते प्रतिमापूजन
सर्वप्रथम प्रमुख पाहुणे नूतन मराठा महाविद्यालयाचे, शालेय शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे, शाळेच्या मुख्यापिका रेखा पाटील, मुख्याध्यापक डी. व्ही.चौधरी यांच्याहस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा तसेच वर्गाचा परिसर स्वच्छ केला. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी खोमेश निलेश अत्तरदे याने गाडगेबाबा यांची भूमिका साकारून सर्वाना आकर्षित केले.

गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती करणारे एक फिरते विद्यापीठ होते.लोकजीवन तेजाने उजळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावांचे रस्ते झाडीत ते फिरले. विवेकाच्या खराट्याने त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. शिक्षणाचे महत्व पटवून साक्षरतेचा प्रचार केला. जनकल्याणाची विविध कामे त्यांनी यशस्वीरीत्या राबवली. पंढरपूर, देहू, आळंदी, मुंबई इत्यादी ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन वेचले व आपल्या कर्तृत्वाने ते वंदनीय ठरले अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या कर्तृत्वाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम

सद्गुण अंगिकारा, संतांच्या शिकवणीनुसार वागा, पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश प्रमुख पाहुणे प्रा.संदीप साठे यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव, कल्पना तायडे, सरला पाटील, प्रणिता झांबरे, सुधीर वाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रसंगी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

One Response

  1. Yogesh Bhalerao

Add Comment

Protected Content