भारतीय संघ जानेवारीत खेळणार १० सामने

Team India3

 

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय संघ जानेवारी महिन्यात २५ दिवसात १० सामने खेळणार आहे. यात सात टी-२० आणि ३ वनडे सामन्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये भारत पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. यातील चार सामने जानेवारी महिन्यात होणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात एक टी-२० आणि फेब्रुवारी, मार्चमध्ये वनडे आणि कसोटी सामने होतील.

श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामने :- दि. ०५ जानेवारीला पहिला टी-२० (गुवाहाटी), दि.०७ जानेवारी रोजी दुसरा टी-२० (इंदूर) आणि दि.०९ जानेवारी रोजी तिसरा टी-२० (पुणे) सामना होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे :- दि.१४ जानेवारी रोजी पहिली वनडे (मुंबई), दि.१७ जानेवारी रोजी दुसरी वनडे (राजकोट) आणि दि.१९ जानेवारी रोजी तिसरा वनडे (बेंगळुरू) सामना रंगणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० :- दि. २४ जानेवारी पहिली टी-२० (ऑकलंड), दि.२६ जानेवारी रोजी दुसरी टी-२० (ऑकलंड), दि.२९ जानेवारी रोजी तिसरी टी-२० (ऑकलंड) आणि दि. ३१ जानेवारी रोजी चौथी टी-२० (ऑकलंड) मालिका होणार आहे.

Protected Content