भाजप नेते अशोक चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंबड तालूक्यातील अंतरवाली सराटी येथे १६ मार्च शनिवार रोजी मध्यरात्री माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. उपोषण स्थळापासुन जवळच असलेल्या घरात अशोक चव्हाण व मनोज जरांगे यांच्यात दिड ते दोन तास चर्चा झाली.

या वेळी मनोज जरांगे यांनी सरकार कडुन मराठा समाजाची दिशाभुल झाली, सगे सोयरे अधिसुचना व कायद्याची अंमलबजावणी होत नाही, देवस्थान व हैदराबाद चे गॅजेट स्विकारत नाही, खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, चौकशी करीता बोलावुन त्रास दिला जात आहे, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घेतले गेले नाही आदी बाबत अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा केली यात काही मार्ग निघतो का या साठी प्रयत्न करत आहे तसेच जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Protected Content