दिल्लीत भूकंपाचे धक्के

Earthquake 1548918798

दिल्ली प्रतिनिधी । एनसीआरसह उत्तर भारतामध्ये शुक्रवारी ५ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसताच घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. मोकळ्या जागेवर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ५० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अफगाणिस्तानमधील हिंदकूश भूकंपाचं मुख्य केंद्र असून रिश्टर स्केलवर ६.८ इतकी तीव्रता नोंदवण्यात आली. भारतीय वेळेप्रमाणे पाच वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप इतका तीव्र होता की, पंजाब, हरियाणा, उत्तर भारत आणि काश्मीरमध्येही जोरदार धक्के जाणवले. चंदीगढमध्ये लोक भीतीने पळत घराबाहेर आले होते. जवळपास २० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते.

या भूकंपामुळे जिवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या भूकंपामुळे दिल्लीत नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.

Protected Content