रिपाइं आयटी सेल जिल्हा प्रमुखपदी मिलिंद तायडे

ripai news

जळगाव प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या ऑल इंडिया आयटी सेल जळगाव जिल्हा प्रमुखपदी मिलिंद तायडे यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नुकतीच करण्यात आली.

याबाबतचे आयटी सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष महादेव साळवे, सचिव सचिन कटारे, उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया आयटी सेल प्रमुख महेंद्र सोनवणे यांनी हि नियुक्ती जाहीर केली. मिलिंद तायडे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत असून रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यात रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, भडगाव तालुकाध्यक्ष अण्णा खेडकर, चोपड़ा तालुकाध्यक्ष भिवराज रायसिंगे, रावेर युवा तालुकाध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे, यावल युवक तालुकाध्यक्ष संजय तायडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष बाळू निकम, महानगर उपाध्यक्ष अविनाश पारधे, महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे यांची उपस्थिती होती.

Protected Content