पुणे : रिपोर्ट निगेटिव्ह म्हणून डिस्चार्ज दिलेली महिला मृत्यूनंतर निघाली कोरोनाग्र्स्त !

 

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज मिळाला होता. परंतु पुन्हा प्रकृती ढासळल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, मयत महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली.

 

दोन दिवसांपूर्वी एका 60 वर्षीय महिलेला मयत अवस्थेत ससून रुग्णालयात आणले होते. या महिलेच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मागील काही दिवसात या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. विशेष बाब म्हणजे या महिलेला नायडू रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आता मृत्यूनंतर तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

 

राज्यात शनिवारी २४ तासांत एकूण १४५ नव्या रुग्णांची नोंद असून आज सकाळी बुलडाण्यात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ६३८ वर पोहोचली आहे. यापैकी ९९ रुग्णांची नोंद ही मुंबईत झाली आहे. पुण्यात १२, ठाणे जिल्हा व अन्य मनपामध्ये २२, नागपूर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती प्रत्येकी १, लातूर ८, उस्मानाबादेत २ रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ६ जणांचा मृत्यू नाेंद झाला. यापैकी ४ जण मुंबईतील, १ मुंब्रा ठाणे व १ अमरावतीचा आहे. मृत्यूंचा आकडा आता ३२ वर पोहोचला आहे.

Protected Content