हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द; बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे हिंगोलीतून खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचा मित्रपक्ष भाजपाच्या दबावामुळे त्यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली आहे, अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेनेकडून गेल्या आठवड्यात ८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोलीतून सध्या खासदार असलेले हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे या विरोधामुळे शिवसेनेला हिंगोलीतून त्यांची उमेदवारी रद्द करावी लागली आणि त्यांच्याऐवजी शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. ते सध्या शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी हदगांव हिमायत नगरमधून विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती.

Protected Content