वनविभागाच्या धडक कार्यवाहीत २ लाख ३९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील वनसंरक्षक यावल विभाग आणि सहाय्यक वनसंरक्षक यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत सुमारे दोन लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल वनविभागाचे वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर व आगार रक्षक रावेर (अति.का) यांच्यासह मौजे विवरे ते वडगाव रस्त्याने गस्त करीत असताना मौजे विवरे गावाच्या बाहेर ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १९ सि ८८८० या वाहनाने विना परवाना जळाऊ लाकडे वाहतूक करीत असतांना मिळून आले जप्त मुद्देमाल निम जळाऊ २.००० घन मीटर भोकर जळाऊ ४.५०० घन मीटर जळाऊ असून ऐकून घन मीटर ६.५०० असून माल किंमत ९१०० रुपये असून ट्रक्टर क्रमांक एम.एच. १९ सि ८८८० ची बाजारभाव अंदाजीत रक्कम २३०००० ऐकून रक्कम २ लाख ३९ हजार १०० रुपये आहे. सदर गुन्ह्याबाबत आगार वनरक्षक रावेर (अति.का) यांच्या कडील प्र.रि. क्रं.०१/२०२४ ३ एप्रिल २०२४ चा जरी केला आहे.

सदरची कार्यवाही अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर वनरक्षक सुपडू सपकाळे, वाहन चालक विनोद पाटील यांचा सहभाग होते. सदर कार्यवाही ही उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वनपाल रावेर करीत आहे.

Protected Content