अमळनेर येथे रेल्वे स्थानकावर एअरगनसह दोघांना केली अटक

amalner 2

अमळनेर प्रतिनिधी ।  अमळनेर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवासी गाडीत संशयित रित्या हालचाली करणाऱ्या दोघांना पकडण्यात अमळनेर रेल्वे पोलीसांना यश आले आहे. एकाकडून एअरगन जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर रेल्वे स्थानकावर दोन तरूण रविवार 12 मे रोजी दुपारी 1.30 बिहारकडे जाणारी अंत्योदय एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्र 2 वर थांबली. गाडीच्या जनरल कोच मध्ये दोन तरुण संशयास्पद हालचाली करतांना दिसले त्यांना विचारपूस करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल मनीष तलखंडे यांनी बोलावलेत्यानुसार त्यांनी सापळा रचून त्यांची विचारपूस करण्यास सुरूवात केली. तेवढयात दुसऱ्याने पळ काढण्याच्या प्रयत्न केला असता प्रवाश्यांच्या मदतीने दोघांना पकडण्यात यश आले. जाहिद शाहीदलक मकरांनी वय 22 वर्ष रा. गेंदालाल मिल जळगाव व राजेश उर्फ दादू एकनाथ निकम रा. सुभाष चौक जुना पारधी वाडा असे दोघे संशयित आरोपींचे नावे आहे. दोघांकडून एक एअर गण देखील मिळून आली आहे. पुढील तपास नंदुरबार स पो नि विकास थोरात करीत आहे.

यापुर्वीही आहे गुन्हा दाखल

दरम्यान आरोपी मकराणी यास यापूर्वीही प्रेरणा एक्समध्ये चाकू घेऊन प्रवाश्यांवर दहशत माजवत असतांना सहाय्याक फौजदार छोटू शिंदे यांनी पकडून आर्म ॲक्टनुसार कार्यवाही केली होती. तर यापूर्वी पोलीस नाईक रवी पाटील यांच्यावर दोन गुन्हेगारांनी त्यांची गाडीची नासधूस करून पोलीस चौकीत घुसून त्यांना गावठी कट्टा लावल्याची घटना घडली होती. या ठिकाणी सतत अशा घटना होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व रेल्वे सुरक्षा बलने गांभीर्याने दखल घेत लक्ष देणे गरजेचे आहे.

Add Comment

Protected Content