रावेर शहरात वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई; दोन जणांवर गुन्हा दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात रात्रीच्या वेळी अवैध वाळूची वाहतुक करीत असतांना ट्रक्टर-ट्रॉलीवर आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांनी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत दोन आरोपीं विरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर शहरात रात्रीच्या वेळीस आईपीएस तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग गस्तीवर असताना रावेर शहरात आल्या होत्या. त्यांच्या सोबत पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल देखील होते. यावेळी गांधी चौकातुन अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर एमएच २० एवाय ६४३२ अन्नापूर्णा सिंग यांनी पकडले. या सोबत ट्रॅक्टर सोबत असणारे मोटरसायकल क्रमांक एमएच १९ एक्यू ४२८६ असे एकूण दोन लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पो. कॉ. गफार तडवी यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिस स्टेशनला आरोपी निलेश कुंभार व ट्रॅक्टर मालक अकबर बेग यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रिया वसावे करीत आहे. यामुळे वाळू वाहतुकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content