रस्त्यातील खड्डयाने घेतला उद्योजक अनिल बोरोलेंचा बळी

anil shridhar borole deathजळगाव प्रतिनिधी । शहरातील गजबजलेल्या चित्रा चौकात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अनिल बोरोले यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले व आयशरने त्यांना चिरडले. हा भयंकर प्रकार लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या प्रतिनिधी जयश्री निकम यांनी प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी पाहिलेला हा ‘आंखो देखा हाल !’

लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या प्रतिनिधी जयश्री निकम या मुक्तांगणमध्ये आयोजित कार्यक्रमाला कव्हर करून कार्यालयात रिक्षाने परत येत होत्या. यावेळी त्यांच्या रिक्षाच्या अगदी समोरच स्कुटीवरून एक व्यक्ती पडून त्यांचा भरधाव वेगाने आलेल्या आयशरने चिरडल्याचे पाहिले. हा प्रकार इतका भीषण होता की, अक्षरश: दुचाकीस्वाराच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. आयशर चालकाने थोडी पुढे गाडी नेऊन थांबवली. मात्र लोकांच्या गर्दीचा फायदा घेऊन तो घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने अगदी हाकेच्या अंतरावर असणार्‍या वाहतूक पोलिसांना याची माहिती दिली. मात्र त्यांनी तब्बल २५ मिनिटांनी त्यांनी घटनास्थळी येण्याचे सौजन्य दाखविले. यामुळे उपस्थितांनी चांगलाच संताप व्यक्त केला. तर अपघात झाल्यानंतर चित्रा चौक व अलीकडच्या पुष्पलता बेंडाळे चौकातील वाहतूक पोलीस गायब झाल्याचे दिसून आले.

अपघात झालेले ठिकाण पाहिले असता रस्त्याच्या बाजूला एक कार पार्क केलेली असून तेथेच कोपर्‍यावर (रस्ता व साईडपट्टीमध्ये ) एक मोठा खड्डा असल्याचे निदर्शनास आले. हा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला. यामुळे ते रस्त्यावर पडले. यामुळे मागून आलेल्या आयशर ट्रकचे मागचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. या भागात रस्त्याच्या डाव्या बाजूला नेहमीच वाहने पार्क केलेली असतात. आजही येथे कार उभी होती. यामुळे रस्ता अरूंद झाला होता. यातच खड्डा चुकवतांना बोरोले यांचा अंदाज चुकला आणि त्यांचा घात झाला. यामुळे रस्त्यांवर उभी असणारी वाहने, यामुळे अरूंद झालेले रस्ते व रस्त्यातील खड्डे यामुळे आता जळगावकरांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे आजच्या अपघातातून दिसून आले आहे.

Protected Content