Home Cities जळगाव स्त्री जातीच्या अर्भकाला वाचविणाऱ्या संदीप साळवे यांचा सत्कार

स्त्री जातीच्या अर्भकाला वाचविणाऱ्या संदीप साळवे यांचा सत्कार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अहिरवाडी परिसरात मोहगंज रस्त्यावर आढलेल्या एका दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला तातडीने उचलून उपचारार्थ दाखल करून संदीप साळवे यांनी जीव वाचविले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत बेटी बचाओ बेटी पढाओच्या महाराष्ट्र संयोजिका डॉ. शुभा पाध्ये (फरांदे) यांच्याहस्ते साळवे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, भाजपाचे शहराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेडाळे, बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जळगाव शहर संयोजिका अॅड . मनिषा पाटील ,दिप्तीताई चिरमाडे ,जाई जगताप सहसंयोजक सचिन पाटील, लक्ष्मण पाटील चोपडा, कार्यालयमंत्री गणेश माळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound