महापालिकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये श्रेयश तर मुलींमध्ये पूर्वा प्रथम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कांताई सभागृहात जळगाव महापालिका, जळगाव जिल्हा बुध्दीबळ संघटना, जैन स्पोर्टस अकॅडमी आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्तविद्यामानाने महापालिकास्तरीय १७ वर्षाखाली बुध्दीबळ स्पर्धेत मुलांमध्ये श्रेयश तर मुलींमध्ये पुर्वा प्रथम विजय आले आहे. मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

जळगाव महापालिका, जळगाव जिल्हा बुध्दीबळ संघटना, जैन स्पोर्टस अकॅडमी आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्तविद्यामानाने शनिवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी शहरातील कांताई सभागृहात बृध्दीबळ सर्धेचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात मुलांमध्ये श्रेयश उपासनी तर मुलींमध्ये पूर्वा जोशी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळविले आहे. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या स्पर्धेतील प्रथम ५ मुले व ५ मुलींना जळगाव स्पोर्ट्स हाऊस तर्फे सुवर्णपदक देण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख,महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव प्रवीण ठाकरे व जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे रवींद्र धर्माधिकारी यांच्यासह आदी उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे सोमदत्त तिवारी प्रशांत पाटील किरण सोनवणे हिमांशू जैन दर्शन गायकवाड यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील अंतिम दहा विजेते खेळाडू
मुले
श्रेयस भूषण उपासनी, ओरियन सीबीएससी स्कूल, सुजल प्रदीप चौधरी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय, यश सुनील सोनवणे, ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय, माजीद मुजाहिद हुसेन, पोदार इंटरनॅशनल स्कूल जळगाव, प्रेम विनोद पाटील,आर आर विद्यालय

राखीव
वेद दीपक गुप्ता,अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव.

 

जळगाव
मुली
पूर्वा मोहन जोशी अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव ,जानवी संजय सपकाळे भारतीय ज्युनिअर कॉलेज जळगाव, आर्या मनीष बाविस्कर उज्वल इंटरनॅशनल स्कूल जळगाव, श्रावणी किरण नेमाडे आर आर विद्यालय जळगाव, जानवी प्रदीप सोनवणे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव,

राखीव – भूमिका सूर्यवंशी महाविद्यालय जळगाव.

 

Protected Content