वड्री येथील प्रौढ व्यक्ती बेपत्ता

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वड्री धरण येथून ४५ वर्षीय व्यक्ती घरात कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यावल पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, यावल तालुक्यातील वड्री धरण येथील रहिवासी भियाण भंजा बारेला हा २९ मार्च रोजी सकाळी ५ वाजता  घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. भयाण याची पत्नी चिमा बारेला यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे आणि परिसरात शोधाशोध केली. परंतु ते कोठेही मिळून आले नाही. अखेर यावल पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे.  चीमा भियाण बारेला (वय-४०) खबरी वरून यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे .

Protected Content