बोढरेत भुयारी गटारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे!

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील बोढरे गावात भुमिगत गटारीचे बांधकाम सुरू आहेत. मात्र सदर बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. ग्रामपंचायती व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे काम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील बोढरे गावात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भुमिगत गटारीचे बांधकाम सुरू आहेत. मात्र सदर बांधकाम हे इस्टिमेट प्रमाणे होत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहेत. गटारीच्या वरच पाईप दिसत असून वरती माती लोटून बुजविण्यात येत आहे. या कामाविषयी ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या. परंतु ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान ‌ग्रामसेवकांसह संबंधित अधिकाऱ्यांना इस्टिमेट विषयी विचारणा केली असता आमच्याकडे इस्टिमेटच नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे सदर ठिकाणी विना इस्टिमेट प्रमाणे काम सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Protected Content