नगरपालिकेकडून कर वसुलीच्या मोहीमेला सुरूवात !

चाळीसगाव प्रतिनिधी । नगरपालिकेकडून कर वसुली मोहीमेला सुरूवात करण्यात येत असून थकबाकीदारांनी लवकरात लवकर करांची थकबाकी भरून नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

शहरातील ज्या थकबाकीदारांनी कर भरणा कले नसतील अशांनी मार्च अखेरची वाट न बघता लवकरात लवकर भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे. दैनंदिन वसूली प्रमाणे सोबतच नळजोडणी बंद करणे, गाळा सील करणे, जप्ती करणे, थकबाकीदारांची  नावे बॅनरवर प्रसिद्ध करणे अशा प्रकारची कारवाई तीव्र  करण्यात येत आहे. यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तरी थकबाकीदारांनी  लवकरात लवकर करांची थकबाकी भरून नगर पालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. भरणा करावे अन्यथा न.पा. कर्मचार्‍यांना वसुली मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी देखील नागरिकांना थकबाकी लवकरात लवकर भरून न.पा. स सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

Protected Content