आयुक्तांनीही नाही ऐकली गायकवाड कुटुंबियांची कैफियत ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । प्रचंड गाजत असणार्‍या प्रकरणातील पिडीत गायकवाड परिवाराने आज महापालिकेत आयुक्त डॉ. उदय टेकाळे याची भेट घेतली. मात्र आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता चालढकल केल्याचा आरोप गायत्री तुषार गायकवाड यांनी केला आहे. आयुक्त हे कैलास सोनवणे यांची पाठराखण केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तर आयुक्तांनी आपण संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

सध्या संपूर्ण जळगावात खळबळ उडवून देणार्‍या गणपती नगरातील घराच्या अतिक्रमणातील राजकीय दबाव हा चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यावर गायकवाड कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. आज गायकवाड कुटुंबातील गायत्री गायकवाड यांनी आयुक्त उदय टेकाळे यांची भेट घेतली असता त्यांनी चालढकल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रकारांशी बोलतांना केला.

गायत्री गायकवाड यांनी सांगितले की, आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी आम्हाला कागपत्र देण्यासाठी बोलवले होते. आम्ही ते देण्यासाठी आलो असता ते त्यांनी फेकून दिले. ते जी वेळ देतात त्या वेळी आम्ही येतो. मात्र आमचे कागद्पत्र त्यांनी नाकारले आहेत. आयुक्तांनी इतर कोणाचे न ऐकता आम्हा गरीबांना त्यांनी साथ दिली पाहिजे. आयुक्त आम्हाला बोलू देत नाही व आम्हाला नाकारतात अशी तक्रार त्यांनी यावेळी केली. गायत्री गायकवाड यांनी पुढंस सांगितले की , शुक्रवारी आमच्या सोबत जे घडले आहे ते फार विचित्र पद्धतीने घडले आहे. सहाय्य्क नगररचनाकार धामणे, अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांना आमच्याकडे बांधकाम परवानगीचा एक दस्तवेज नसल्याने आम्ही तो संध्याकाळपर्यंत देतो असे सांगितले. यानंतरही त्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम पडले आहे. आम्ही त्यांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी ती विनंती फेटाळून लावली. आज आम्ही आयुक्त यांची भेट घेऊन आमची बाजू मांडली. यानंतर आयुक्त यांनी त्यांनी कागदपत्रांचा सेट पुन्हा देण्याचे सांगून यानंतर कायदेशीर कारवाई करू असे सांगितले. यावेळी आम्ही त्यांना स्पष्ट केले की, सहाय्यक नगररचनाकार धामणे यांच्याकडे तो सेट दिला आहे. आम्ही कागदपत्र देऊनही आमच्याकडे पुन्हा पुन्हा कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, गायकवाड यांनी आरोप केला की , कैलास नारायण सोनावणे यांची आयुक्त टेकाळे हे पाठराखण करत आहेत. त्यांनी आमच्या सारख्या गरिबांवर अन्याय होऊ नये यासाठी आमची बाजू घेण्याची गरज असल्याचे गायत्री गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, या वादग्रस्त प्रकरणात आता थेट आयुक्त टेकाळे यांच्यावर आरोप करण्यात आल्याने याला गंभीर वळण लागल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात आयुक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, मी या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करणार असून यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

पहा : आयुक्तांच्या भेटीनंतर गायकवाड कुटुंबियांचे म्हणणे.

Add Comment

Protected Content