Home क्राईम बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

0
108


yawal Bus news

 

जळगाव प्रतिनिधी । भरधाव कार समोरून येत अचानकपणे रस्त्यावर थांबल्याने बसचालकाने प्रसंगावधनाने तात्काळ ब्रेक लावल्याने बस रोडच्या कडेला जावून थांबली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.

याबाबत माहिती अशी की, जळगाव आगाराची बस क्रमांक (एमएच 20 बीएल 1405) यावलकडे दुपारी 4 वाजेच्या सुमारास विदगावमार्गे जात असतांना असतांना ममुराबाद येथील कृषी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने येणारी कार अचानकपणे भररस्त्यावर थांबल्याने बसचालकाने प्रसंगावधनाने बसवर ताबा मिळवित बस थेट रस्त्याच्या बाजूला उतरवून थांबविली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर कारचालक कारसह फरार झाला होता. यावेळी परीसरातील नागरीकांनी गर्दी जमली होती. त्यानंतर बस यावलकडे रवाना झाली.


Protected Content

Play sound