जिल्हात सहा कोरोना पॉझिटीव्ह; भुसावळातील पाच, तर जळगावातील एक

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज अजून सहा पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यातील पाच भुसावळचे तर एक जळगावचा असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

आज सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोनाबाबतचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून अपडेट केले आहे. यानुसार- जिल्ह्यातील भुसावळ व जळगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 276 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 270 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सहा व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावच्या शिवाजी नगरातील एका व्यक्तीचा तर भुसवाळ येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 388 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

याआधी आलेल्या रिपोर्टमध्ये भुसावळ शहरातील तब्बल २५० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. तर एक पॉझिटीव्ह असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली होती. यानंतर मात्र पुन्हा पाच पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आज भुसावळात आधी एक आणि नंतर पाच असे एकूण सहा कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यातील एक वरणगाव येथून पाच शहरातील आहेत. तर शहरातील दोन रूग्ण हे गांधीनगर, एक सिंधी कॉलनी, एक आंबेडकर नगर तर एक हुडको कॉलनीतील असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने संबंधीत रूग्णांचा रहिवासा असणारा भाग सील करण्याची तयारी सुरू केली आहे.

Protected Content