स्टार सिनेमा गृहातील तिजोरी फोडून ४७ हजारांची रोकड चोरणाऱ्यास अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । दिवसभर स्टार सिनेमा गृहातील तिकीटांची विक्री करुन गोळा झालेली ४७ हजारांची रोकड मॅनेजच्या कॅबिनमधील तिजोरीत ठेवलेली होती. ती तिजोरी चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास चोरी नेल्याची घटना सोमवारी २९ रोजी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली. शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात घटनेचा उलगडा करत तिजोरी लांबवणाऱ्या मंगेश वाल्मिक पाटील (रा. खोटेनगर) या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील स्टार सिनेमागृह येथे वासुदेव काशिनाथ पाटील यांच्यासह हेमंत पाटील व आकाश चौधरी हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. सिनेमागृहाची दिवसभरात तिकीटाची विक्रीतून मिळालेली रक्कम मॅनेजरच्या कॅबिनमधील तिजोरीत ठेवली जाते. रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी ४ ते २ वाजेपर्यंत हेमंत पाटील व त्यांच्यासोबतचा स्टाफ कामावर हजर होते. तिकीटाची विक्री करुन गोळा झालेली रोकड त्यांनी तिजोरीत ठेवली. त्यानंतर कॅबिनचा कडीकोयंडा लावून सिनेमागृहाचा मुख्य दरवाजाला कुलूप लावून त्याची चावी रात्रपाळीचा सिक्युरीटी गार्ड मनिष भावसार यांच्याकडे देवून ते रात्री दोन वाजता निघून गेले. दुसऱ्या दिवशी सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हेमंत पाटील यांनी वासुदेव पाटील यांना फोन करुन कॅबिनमध्ये ठेवलेली तिजोरी दिसत नसल्याचे सांगितले. त्यानुसार लागलीच वासुदेव जोशी, आकाश चौधरी हे त्याठिकाणी आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यामध्ये सोमवारी २९ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला आणि तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला इसम कॅबिनमध्ये येवून तो तिजोरी घेवून जातांना दिसला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सिनेमा गृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर तपासचक्रे फिरवित त्यांनी त्याठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस असलेला मनिष वाल्मिक पाटील याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने आपणच चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला.

Protected Content