सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रेम विवाह केल्याच्या वादातून तरूणासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत तरूणीचे अपहरण केल्याचा प्रकार तालुक्यातील सावखेडा येथे घडला असून या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील सावखेडा येथील एका तरुणाने अलीकडेच प्रेम विवाह केला होता. मात्र याचा राग तरुणीच्या नातेवाईक यांना आल्याने त्यांनी दि १९ रोजी सावखेडा येथे जाऊन तरुणाचे घरात घुसून तरुणास त्याचे आई वडील व नातेवाईक यांना मारहाण करून तरुणीस तिची इच्छा नसतांना तीस घेऊन जाऊन तिचे अपहरण केले अशी फिर्याद प्रफुल्ल रमेश पाटील वय २६ यांनी दिली आहे
या बाबत फिर्यादीची फिर्याद की, वरील नमुद तारखेस वेळी व ठिकाणी दि १९/०५/२०२३रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास माझ्या घरी सावखेडा गावात माझ्या घरी मी प्रेमविवाह करुन आणलेली माझी तसेच आई , वडील, भाऊ व आजी, आजोबा असे सर्व घरात हजर होते. खरं तर आम्ही दोघांनी आमच्या मर्जिने जळगाव येथुन जावुन बर्हाणपुर येथिल न्यायालयात नोटरी पध्दतीने लग्न लावुन गायत्री संस्कार ट्रस्ट रेणुका नगर बर्हाणपुर येथे नोंदणीकृत विवाह केल्याने याचा राग आल्यावरुन सुमारे २०ते ४०मुले असे चार चाकी वाहन व इतर मोटार सायकल वर येवुन ते सर्व घरात घुसुन त्यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉंडने घरातील सामनाची नासधुस केली. आणि माझ्या आई वडीलांना त्यांचे हातातील लोखंडी रॉडने मारत असतांना माझा भाऊ प्रज्वल याने त्यांना आडवले असता त्याचे तोंडावर व डाव्या हाताच्या पंजास दुखापत केली. यातच त्यांनी माझ्या आईच्या गळयातील सोन्याचे पोत तोडुन नुकसान केले. नंतर काही लोकांनी मला व आजी यांना लोखंडी रॉडने अंगावर मारहाण करुन आम्हाला जमिनीवर ढकलुन दिले.
याचवेळी माझ्या पत्नीला तिचा हात धरुन बळजबरीने घरातुन ओढत आणुन तिचे अपहरण करुन त्यांनी सोबत आणलेल्या पांढर्या रंगाच्या कारमध्ये बसवुन जळगाव येथे घेवुन गेले असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. म्हणुन गुन्हा वैगरे मजकुराचे फिर्यादी वरुन सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सावदा पोलीस करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.