तरसोद येथील विवाहितेचा २५ लाखासाठी छळ 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देणेकरांची देणी देण्यासाठी माहेरून विवाहितेने २५ लाख रुपये आणावेत, यासाठी तालुक्यातील तरसोद येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात हिमाली शैलेन्द्र सूर्यवंशी (वय २१, रा. पुष्पम टेनामेन्ट गोत्री वडोदरा राज्य गुजरात ह.मु. तरसोद ता.जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्न होवून काही दिवस उलटल्यानंतर हिमाली यांना तिचे पती शैलेंद्र शालीग्राम सुर्यवंशी यांच्यासह सासरच्यांनी अपशुकनी म्हणून मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी हिमाली हिने माहेरुन २५ लाख रुपये आणावेत म्हणून हिमालीचा वेळावेळी शिवीगाळ व मारहाण करत मानसिक व शारिरीक छळ केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. छळाला कंटाळून हिमाली या माहेरी तरसोद येथे निघून आल्या. व शुक्रवार, २२ एप्रिल रोजी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन हिमाली हिचे पती शैलेंद्र शालिग्राम सूर्यवंशी , सासू रत्ना शालिग्राम सूर्यवंशी, सासरे शालिग्राम रामराव सुर्यवंशी, नणंद मोनल भुषण पाटील, नंदोई भुषण पाटील, नणंद सोनल जितेंद्र पाटील सर्व रा. वडोदरा , गुजरात) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके हे करीत आहेत.

Protected Content