२४ तासाच्या आत निर्णय द्या –

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तीन मागण्याचे निवेदन दिले. यात २४ तासाच्या आत निर्णय द्या अन्यथा कायदेशीर मार्गाने जाणार असल्याचे आ.अतुल भातखळकर यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना म्हटले आहे.

भाजपाच्या ‘पोलखोल अभियान’ दरम्यान ठिकठिकाणी हल्ले करीत अडथळे आणले जात आहेत. मोहीत कंबोज यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या संदर्भात ३०७ चा हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करून चौकशी करावी, पोलखोल यात्रेवरील हल्ल्याचे समर्थन शिवसेनेचे सर्व महत्वाचे नेते हे जाहीरपणे करीत असून त्यांची या हिंसाचाराला फूस आहे, या सम्पूर्ण घटनाक्रमाचा तपास क्राईमब्रँच मार्फत करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, या तीन प्रमुख मागण्या भाजपा आमदारांच्या शिष्टमंडळाने आज निवेदनाद्वारे मुंबई शहर पोलीस आयुक्तांकडे केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण घटना प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे द्यावा आणि कालबध्द मर्यादेत या सर्व गोष्टींचा तपास करावा. या संदर्भात ते २४ तासांत काही निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. पोलीस आयुक्तांनी योग्य तो निर्णय घेतला नाही तर, कायदेशीरदृष्ट्या पुढचा निर्णय आम्ही घेऊ, अशी माहिती भाजपा आ. अतुल भातखळखर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आ. अतुल भातखळकर, मोहीत कंबोज, मंगलप्रभात लोढा आदी शिष्टमंडळ सदस्य उपस्थित होते.

Protected Content