दोनदिवसीय बूथ व्यवस्थापन सेमिनारसाठी नावनोंदणीचे आवाहन

 

जळगाव, प्रतिनिधी | पुणे येथे दोनदिवसीय कॅम्पेन आणि बूथ व्यवस्थापन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात एमआयटी संस्थेच्या स्कुल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २७ व २८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील क्रियाशील व्यक्तींसाठी प्रवेश आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व राजकीय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी हा सेमिनार मार्गदर्शक ठरणार आहे. यात निवडणुकीचे डाटा विश्लेषण व संशोधन याविषयी राजकीय विश्लेषक महेश साने, निवडणूक व्यवस्थापनात सोशल मीडियाची भूमिका यावर जेष्ठ पत्रकार विश्वनाथ गरुड, बूथ व्यवस्थापनाविषयी राजकीय शास्त्रज्ञ अमर जाधव, कॅम्पेन व्यवस्थापन विषयी वरिष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे आदी माहिती देणार आहे. जळगाव जिल्ह्यातील इच्छुकांनी पांडे डेअरी चौकातील युवाशक्ती फाउंडेशनच्या कार्यालयात विराज कावडिया (९४२२२ २२६९९), मनजीत जांगीड यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content