दहीगावात सत्तांतर; सासरा-सुनेच्या विजयाने वेधले लक्ष !

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या दहीगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले असून यात सासरा व सुनेचा विजय लक्षवेधी ठरला आहे.

तालुक्यातील दहीगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा गावकर्‍यांनी मात्र भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागला असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले असून १३ पैकी ९ जागा काँग्रेसच्या पारडयात पडल्या. येथे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश देवराम पाटील व देविदास धांगो पाटील यांचे लोकमान्य पॅनल तर ललित पाटील, दिलीप पाटील व किशोर महाजन यांचे संयुक्त परिवर्तन पॅनल होते.

गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीवर भाजपाची एक हाती सत्ता होती. या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र जुन्या विरुद्ध नवख्यांची टक्कर होती. या लढतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमध्ये नवख्यांना उमेदवारांना निवडणुकीत संधी दिली होती. परिणामी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनला स्पष्ट बहुमत मिळाले असुन भाजपाच्या अनुभवी व मातब्बर उमेदवारांचे या निवडणुकीत पानीपत झाले.

भाजपाचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवीदास पाटील यांनी त्यांच्या प्रभागातील तिन्ही जागांवर निर्विवाद विजय मिळविला. मात्र मासाकाचे माजी संचालक जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश देवराम पाटील यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक चार मधून जेमतेम फक्त त्यांचीच जागा वाचविण्यात यश आले असुन इतर दोन जागांवर मात्र त्यांच्या पॅनल उमेदवारांचा पराभव झाला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमध्ये किशोर मधुकर महाजन यांच्या प्रभाग क्रमांक एक मधुन त्यांची सून पल्लवी गौरव महाजन यांचा दोन मधुन देखील दणदणीत विजय झाला. हा विजय खर्‍या अर्थाने लक्षणीय ठरला आहे. तर, माजी सरपंच उपसरपंच गुलाब बाबुराव चौधरी त्यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक चार मधून विजयी झाले आहेत. नवनिर्वाचित विजयी झालेल्या उमेदवारांकडून गावाचा विकास हाच आमचा ध्यास या ब्रीद वाक्य चे सत्य कितपत खरे ठरेल याकडे दहीगावकरांचे लक्ष वेधून आहे.

Protected Content