वूमन फिडे मास्टर भाग्यश्रीचे स्वागत

WhatsApp Image 2019 09 25 at 3.58.15 PM

जळगाव, प्रतीनिधी |दिल्ली येथून वेस्टर्न एशियन युथ चेस चॅम्पियनशिप जिंकून ‘वूमन फिडे मास्टर’चा खिताब घेऊन भाग्यश्री प्रवीण पाटीलचे बुधवारी के. के. एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन होताच तीचे विविध संघटनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

भाग्यश्री पाटीलचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारूक शेख,जिल्हा संघटनेचे सहसचिव संजय पाटील, रवींद्र धर्माधिकारी, भाग्यश्रीचे पूर्वाश्रमीचे प्रशिक्षक प्रवीण ठाकरे,बु द्धीबळ खेळाडू च्या पालकांच्या वतीने शकीला तडवी व जलतरण संघटनेचे कमलेश नगरकर यांनी  शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाग्यश्रीचे वडील प्रवीण पाटील यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. १० देशातील ११६० खेळाडूंमध्ये भाग्यश्रीने २ सुवर्ण पदक पटकाविले आहे.वूमन फिडे मास्टर हा बहुमान पटकवणारी भाग्यश्री ही खान्देशातून पहिली महिला आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन, अध्यक्ष सिध्दार्थ मयूर, उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजित कुंटे व सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Protected Content