दुकानांवर नजर ठेवण्यासाठी पथकाची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असल्यामुळे रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान दुकान अथवा हॉटेल सुरू राहिल्यास महापालिकेच्या पथकाकडून सीलची कारवाई केली जाणार आहे. यासाठी ९ कर्मचार्‍यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

राज्य सरकारने राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी २२ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत राहणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संचारबंदीचे शहरातील व्यावसायिकांकडून पालन होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सर्वच विभागांना निर्देश दिले आहेत.

महापालिकेने देखील शहरासाठी अतिक्रमणाच्या ९ कर्मचार्‍यांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. हे पथक रात्री ११ वाजेपासून शहरात फेरफटका मारून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानदारांना सूचना देत आहे. तसेच वारंवार सूचना दिल्यानंतरही दुकाने सुरू ठेवल्यास सीलची कारवाई केली जाणार आहे.

Protected Content