जळगाव प्रतिनिधी । दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरूणांच्या हाताला किरकोळ जखमी झाल्याची घटना आज घडल्या. झाडाचा पाला तोडतांना विळा हाताच्या बोटाला लागल्याने बोटांना गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या घटनेत हातोडा निसटल्याने हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
पहिल्या घटनेत माजिद सुपडू पठाण (वय-33) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हा बकऱ्यांसाठी लागणारा पिंपळाच्या झाडाचा पाला तोडण्यासाठी विळ्याचा वापर करत होता. झाडाचा पाला तोडतांना चुकून विळा हाताच्या बोटांवर गेल्याने उजव्या हाताचे दोन बोटे गंभीर जखमी झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत अरूण देवीदास इंगळे (वय-28) रा. लक्ष्मीनगर जळगाव सेटींगचे काम करणारा मजूर असून छीनी हातोड्याने काम करतांना होता बोटावर आल्याने गंभीर दुखापत झाली. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.