सावदा येथील एकाचा गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावदा येथील 30 वर्षीय तरूणाने राहत्या घरात कोणीही नसतांना साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजारचांच्या लक्षात आल्याने त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

रामकृष्ण भीकन पवार (वय-30) रा. सावदा ता.जि.जळगाव हा मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज घरात कोणीही नसतांना साडीच्या सहाय्याने छताला गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला. हा प्रकार शेजारचांच्या लक्षात आल्याने धाव घेवून रामकृष्ण याला खाली उतरवून खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी गावातीन नागरीक व तरूणांची इस्पीतळात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.

Protected Content